WE THE PEOPLE !
…तर प्रकाश आंबेडकरांसोबत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही – शिवेंद्रराजे भोसले
सातारा : आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता आपले राजकीय अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी अनेक पक्षातील नेते पक्षांतर करत आहेत. तसेच काही नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शिवेंद्रराजे भोसले. त्यांचे देखील नाव पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या यादीत होते. मात्र खुद्द आता शिवेंद्रराजे यांनी खोचक टिपणी करत पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शिवसेना शहर अध्यक्ष सचिन जवळ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, आता सर्वांच्या मतानुसार माझे सर्व पक्ष झाले आहेत. आता फक्त प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी एवढाच पर्याय शिल्लक राहिला आहे. मग काय करायच तोच पर्याय योग्य वाटतोय, असे म्हणत शिवेंद्रराजे यांनी उपस्थितांच्या चर्चांना आळा घातला.
दरम्यान, शिवेंद्रराजे शिवसेनेत दाखल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. कारण लोकसभा निवडणुकीवेळी सातारचे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे अनेकांनी या भेटीचा निष्कर्ष पक्षांतर असा काढला. मात्र तसे काही झाले नाही. तसेच शिवेंद्रराजे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर त्यांनी लोकसभेतून माघार घेतली.
No comments:
Post a Comment