वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कांही वर्तमानपत्रे सातत्याने खोट्या बातम्या पसरवत आहेत.
3/7/2019
by facebook source
वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कांही वर्तमानपत्रे सातत्याने खोट्या बातम्या पसरवत आहेत. अफवा पसरवत आहेत, उलटसुलट बातम्या छापून स्वतःच्या दैनिकाचे नाव चमकाविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यामुळे या संबंधित दैनिकांची विश्वासार्हता संपुष्टात येत आहे. त्यांचे समाजामध्ये हसू होत आहे. त्यांची टिंगल - टवाळी केली जात असून त्यांना शिव्यांची लाखोलीही वाहिली जात आहे.
मुळात कोणत्याही सोर्सशिवाय अथवा बायलाईनशिवाय बातमी छापणे हाच एक मोठा दोष असून तो संबंधित वर्तमानपत्रांनी दूर करावा... अन्यथा तुमच्या दैनिकावरचा, तुमच्या लेखणीवरचा विश्वास कायमचा नाहीसा होईल. त्यावेळेस तुमची ही वर्तमानपत्रे कोणी रद्दीसाठीही विकत घेणार नाही.
तेंव्हा वंचित बहुजन आघाडी संदर्भात उलटसुलट बातम्या छापणाऱ्या सर्व दैनिकांना माझी विनंती आहे की, तुम्ही वर्तमानपत्राची रद्दी विकू नका तर तुम्ही तुमची बुद्धी विका....!!
बाळासाहेबांना बीजेपी राज्यसभेवर पाठविणार हे खोडसाळ वृत्त देताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही ? तुम्ही तुमची अक्कल गहाण ठेवली आहे का ? इतकी पोरकट पत्रकारिता करण्याऐवजी कोणाच्यातरी मळ्यात भांगलायला जावा किंवा म्हसरावरचे गडी म्हणून काम करा आणि त्याचा पगार वंचित बहुजन आघाडीकडून घेऊन जा...!
- अमोल पांढरे
from facebook post :Sujat Ambedkar.
from facebook post :Sujat Ambedkar.
No comments:
Post a Comment