WE THE PEOPLE !
ईव्हीएमविरोधात प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, अजित पवार एकाच मंचावर?
मुंबई : येत्या क्रांती दिनी अर्थात ९ ऑगस्टरोजी ईव्हीएमविरोधात राजकीय पक्ष आणि विविध संघटना मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधी भूमिका अनेकवेळा जाहीर बोलून दाखवली आहे. त्यामुळे या मोर्चात प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, अजित पवार एकाच मंचावर येतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, तसे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच या मोर्च्यात प्रमुख विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत.
राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमच्या मुद्याबाबत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयुक्तांकडे केली होती. तर प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी ईव्हीएमविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. या आंदोलनात सर्वच पक्षांनीएकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले होते.
No comments:
Post a Comment