WE THE PEOPLE ! काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार ; हे ११ दिग्गज नेते शिवसेना-भाजप, ‘वंचित’च्या वाटेवर? - We The People ! [ Daily News ]

We The People ! [ Daily News ]

We the People ! [ Daily news ] , is a Free Web News Paper . Dedicated to Phule , Shahu , Ambedkari Movement . !! TRYING TO BE LOYAL , WITH DR.B.R AMBEDKAR.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 20, 2019

WE THE PEOPLE ! काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार ; हे ११ दिग्गज नेते शिवसेना-भाजप, ‘वंचित’च्या वाटेवर?

WE THE PEOPLE !

काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार ; हे ११ दिग्गज नेते शिवसेना-भाजप, ‘वंचित’च्या वाटेवर?


All Party
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय तयारीला लागले आहे . यापार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले असून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठे खिंडार पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत . काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक विद्यमान आमदार आणि पदाधिकारी लवकरच शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पॉलिटिकल रिसर्च अँड अ‌ॅ नालिसेस ब्युरोने यासंदर्भात अंदाज वर्तवला आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादीला मोठा पराभवाचा धक्का सहन करावा लागला . यामुळे दोन्ही पक्षातील आमदार आणि काही दिग्गज नेते पक्षनेतृत्वावर नाराज आहेत . या पक्षातील 9 विद्यमान आमदार आणि 4 दिग्गज नेते शिवसेना-भाजपमध्ये तर काहीजण वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता . आता हा दावा खरा ठरतो का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
     काँग्रेस -राष्ट्रवादीला रामराम ठोकू शकतात ‘हे’ नेते :-
  • भारत भालके- पंढरपूरचे काँग्रेस आमदार- शिवसेनेत जाऊ शकतात .
  • सिद्धराम म्हेत्रे- अक्कलकोटचे काँग्रेस आमदार- भाजपच्या वाटेवर
  • जयकुमार गोरे- माणचे काँग्रेस आमदार- भाजपच्या वाटेवर
  • बबनदादा शिंदे- माढातील राष्ट्रवादीचे आमदार- भाजपच्या वाटेवर
  • रणजीत शिंदे- बबन शिंदेंचे पूत्र- भाजपच्या वाटेवर
  • दिलीप सोपल- बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार- भाजपच्या वाटेवर
  • ज्योती कलानी- उल्हासनगरच्या राष्ट्रवादीच्या आमदार- भाजपच्या वाटेवर
  • संग्राम जगताप- नगरचे राष्ट्रवादीचे आमदार- शिवसेनेच्या वाटेवर
  • अवधूत तटकरे- सुनील तटकरेंचे पुतणे- शिवसेनेच्या वाटेवर
  • रमेश कदम- मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार- शिवसेनेच्या वाटेवर
  • दत्तात्रय भरणे- इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार- उमेदवारी न मिळाल्यास भाजपच्या वाटेवर
  • प्रदीप कंद- शिरुरमधील राष्ट्रवादीचे झेडपी सदस्य- उमेदवारी न मिळाल्यास भाजपच्या वाटेवर
  • चेतनसिंह केदार- राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि युवक तालुकाध्यक्ष- भाजपच्या वाटेवर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad